Monday 12 December 2011

गेले ते दिवस

गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी,बालपणाच्या आठवणीँच्या ठेवल्यात मी साठवणी.या साठवणिँच्या ओघात वाहुन जायला होत,अन् त्या गोड विश्वात राहुन जायला होत.बालपणीचे हे दिवस पुन्हानाही मिळणार,बालपणांच ईँजीनआयुष्याला पुन्हा जुळणार नाही.आयुष्याचे राहाठगाडे असेच पेलावे लागेल,मार्गी येणार्या दुःखांना असेच झेलावे लागेल.थोरांच्या ईशार्य़ावर धडे गिरवले आहेतखर सांगु का मित्रांनो माझे बालपण हरवले आहे......  बाय - ऋषिकेश तिवारी

Thursday 1 December 2011

आपल्याला मराठीची माहीती असायलाच हवी !!!!!!!

*१.झाशीच्या राणी लक्ष्मीबाई नेवाळकर यांनी हिंदीत नव्हे तर मराठीतच मी माझी
झाशी देणार नाही असे म्हटले आहे.
२.रशिया,ऑस्ट्रेलियासह अनेक देशांमध्ये ४४ मराठी रेडीओ केंद्रे आहेत.
३.हरयाणामध्ये १०.५ लाख मराठी राहतात.कराचीत(पाकिस्तान) नारायण जगन्नाथ
विद्यालय  मराठी शाळा असून इथले विद्यार्थी गुणवत्ता यादीत उत्तीर्ण होतात.
४. मराठीप्रमाणॆ अन्य कुठल्याही भाषेतील साहित्यिकांचे दरवर्षी संमेलन होत
नाही.
५.मराठी भाषेत ४८ पेक्षा जास्त साहित्यप्रकार आहेत आणि १३० पेक्षा जास्त
कलाप्रकार असून हा एक जागतिक विक्रम आहे.संगणकावर कंट्रोल पॅनेलमध्ये लोकेशन
इंडीया केले तर सर्व कामे मराठी किंवा इतर भारतीय भाषांमध्ये सहज करता येतात.
६.महाराष्ट्रातील काही इंग्रजी माध्यमातील शाळांनी गणित आणि विज्ञान हे विषय
मराठीतच समजून देण्यास सुरूवात केल्यानंतर विद्यार्थ्यांना ते विषय लवकर व
चांगल्या पद्धतीने समजू लागले आहेत.
७.देशाच्या आर्थिक उत्पन्नातील सर्वाधिक वाटा महाराष्ट्राचा आहे.
८.सांगली व कोल्हापूरमधील मराठी माणसांचे चांदी शुद्ध करण्याचे कारखाने
भारतातील महत्वांच्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत.त्यांचा या व्यवसायात
फ़ार मोठा वाटा आहे.
९.पूर्वी अफ़गाणिस्तान ते कन्याकुमारी व बडॊदा ते बंगाल असे मराठी राज्य पसरले
होते.तेव्हा सबंध भारतात मराठी भाषा प्रथम क्रमांकावर व तृतीय क्रमांकावर
होती.आज मराठीचे स्थान दहावे आहे.मराठी माणसांनी जास्तीत जास्त व्यवहार मराठीत
केले तर ही गुणी भाषा वरच्या स्थानावर पोहोचेल.
*

--------------------------------
पेटवुन टाकिल आख्खा महाराष्ट्र मराठीच्या जयघोषानं...
मी युवा महाराष्ट्राचा...
माझी भाषा.....माझा अभिमान...