Tuesday 15 November 2011

खरचं अशी एक तरी मैत्रिण असावी....
खरचं अशी एक तरी मैत्रिण असावी....
समाजाच्या बंधनांना झुगारून बाजूला येऊन बसावी
आपणही मग तिच्या खांद्यावरहात टाकून
तिला एक गंमत सांगावी
खरचं अशी एक तरी मैत्रिण असावी....
तिच्या वाढदिवसाची तारीख आपण नेमकी विसरावी
लटकेच रागवत तिने आपल्या लक्षात आणून द्यावी
आणि आपण आणलेले सरप्राइज गिफ़्ट पाहून तीची खळी खुलावी
खरचं अशी एक तरी मैत्रिण असावी....
आपले सगळे सिक्रेट जाणणारी
जीची मैत्री आपणास मैत्रीपेक्षाही खास असावी
आई-बाबांशी ओळख करून देताना आपणास कसलीच भीती नसावी
खरचं अशी एक तरी मैत्रिण असावी....
अचानक एके दिवशी संध्याकाळी आपल्यासोबत फ़िरायला यावी
हातात हात धरून तिने आपल्या मनातली गोष्ट सांगावी
अन बघता बघता ती आपल्याला मैत्रिणीपेक्षाह ी अधिक जवळची व्हावी...



खरचं अशी एक तरी मैत्रिण असावी....
माझी ऑनलाइन मैत्रीण...!

कविता पोस्ट करता करता अशीच एकीशी ओळख झाली...

तिच्या कवितेला रिप्लाय देता देता ही ओळख फ्रेंड रिक्वेस्ट पर्यंत जाउन पोहचली...

फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट झाली जी-टॉक वर आमची एक- मेकाशी बोलायला सुरुवात ली,

एक-मेकांची ओळख पटताच मन आमची एक-मेकाना ओळखु लागली ....

बोलणे आमचे दरोज होत होते, मन आमचे तेवढेच जवळ येत होते...

एखाद्या ओळखिच्या व्यक्तीने प्रेम न द्यावे, त्याहुन अधिक एक अनोलखी व्यक्ति ने आपल्यावर प्रेम करावे....

तिच्या विचारताच रात्र घालवावी....

सकाळ होताच ती ऑनलाइन येण्याची वाट पहावी..

ती आल्यावर कालचा दिवस कसा होता याची विचारपूस करावी तिच्याशिच आधी बोलून मग आपल्या दिवसाला सुरुवात करावी..

ऑफिस नंतर ही तिच्याशी बोलायची अफाट इच्छा व्हावी पण तिला तिचा नंबर मागायची हिम्मत न व्हावी..

दरोज बोलायची आपल्याला सवय लागावी पण ही सवय मनाला आनंदायी व्हावी..

तिच्याशी बोलताच सार्या दुखाचा विसर पडावा नव्याने पुन्हा जगायचा जोश जणू अंगात यावा..

फिरत होतो सर्वत्र एक मैत्रीसाठी देव आहे दुनियेमधेय पाठवले तिला माझ्यासाठी...

असे जणू का होते एखाद्या अनोलखी व्यक्तिमुले सारे जीवन पालटून जाते...

आमचे हे नाते असेच राहुदे तिच्या मैत्रीची साथ मला अशीच आयुष्यभर मिळत राहुदे...

अंतरावर असुनही जवळ असल्यासारखी वाटावी अशी एक मैत्रीण आयुष्यात 
प्रत्येकाला मिळावी.. प्रत्येकाला मिळावी....


Find Me On Facebook